Chitra Wagh | Morphed Photo | सोशल मीडीयावर बदनामी, चित्रा वाघ यांच्याकडून तक्रार | Pooja Chavan

0 Просмотры
Издатель
Chitra Wagh | Morphed Photo | सोशल मीडीयावर बदनामी, चित्रा वाघ यांच्याकडून तक्रार | Pooja Chavan
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चित्रा वाघ यांचे मोर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. भाजप नेत्यांनीही या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज चित्रा वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. तसंच, फोटो मॉर्फिंग प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
Категория
Интересное
Комментариев нет.