Valentine Special : रितेश ❤️ जेनेलिया देशमुख प्रेम कहाणी Ritesh Genelia Deshmukh Love Story

11 Просмотры
Издатель
Valentine Special : रितेश ❤️ जेनेलिया देशमुख प्रेम कहाणी Ritesh Genelia Deshmukh Love Story

Genelia Riteish Deshmukh : तेव्हा कुठे जेनेलियाने लग्नासाठी दिला होकार, वाचा लव्हस्टोरी
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. 17 डिसेंबर 1978 मध्ये रितेशचा जन्म झाला. संपूर्ण देशमुख घराणे राजकारणात सक्रिय असल्याने रितेश सुद्धा राजकारणात जाईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण रितेशने हा अंदाज खोटा ठरवत, अभिनयाची वाट निवडली. 2 फेब्रुवारी 2012 रोजी रितेशने अभिनेत्री जेनेलिया डिसुजासोबत लग्न केले.

या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन होती तर रितेश हिंदू. रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा.  आज रितेश व जेनेलियाची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   

हैदराबाद विमानतळावर रितेशने जेनेलियाला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. जेनेलियाने हस्तांदोलन तर केले. पण न करावे अशा थाटात. पहिल्याच भेटीतील जेनेलियाच्या हे वागणे रितेशला खटकले. पण तो शांत राहिला. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.

‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना दोन मुलं आहेत.

अशोक चव्हाण रितेश देशमुख मुलाखत
Ritesh Deshmukh take interview with Ashok Chavan
Категория
Для всей семьи
Комментариев нет.